Saturday, January 25, 2020

अमर जवान

" अमर रहे" च्या घोषणा आणि
फैरी झाडून दिलेला सन्मान
एकदमच विरले हवेत...
उरली ती फक्त त्याची चिता आणि
अर्धवट उभं असलेलं त्याच कुटुंब

मंत्री आले आणि फोटो मध्ये सांत्वन करून गेले
सन्मानपत्रही पडली हातात मेजर, कर्नल कडून
झाली घोषणा सरकारी मदतीची,
सोबत स्तुती त्या वेड्या वीरतेची

थंडावले सारे जसे दिवस, आठवडे, महिने गेले
यादीत हुतात्म्यांच्या आणखी एक नाव जुने झाले


उद्या आपल्या हक्काच्या 2 देशभक्तीच्या दिवसांपैकी एक दिवस म्हणजेच 26 जानेवारी... आपल्यापैकी बरेच जण देशभक्तीपर पोस्ट फॉरवर्ड करून आणि व्हाट्सऍप डी.पी. ला तिरंगा लावून तो साजरा करतीलच.. पण एका क्षणासाठी तरी त्या जवानांच्या पवित्र स्मृतींची आठवण ठेवा... ज्यांच्यामुळे आपण निर्धास्तपणे हे स्वातंत्र्य उपभोगु शकतोय...

No comments:

Post a Comment