Wednesday, December 21, 2016

मिठी

तुझी मिठी...
उबदार हळुवार
वाटे जग विसरून जावे
युगानुयुगे राहावे फक्त तुझ्या मिठीत

Sunday, June 12, 2016

आपली पहिली भेट

अजून आठवते मला
ती आपली पहिली भेट
तो तुझा मखमली स्पर्श आणि अंगावरचे रोमांच
तुझा गंध अजून तसाच मनात जपलेला
तुझे ते हळुवार बोलणे आणि मी मंत्रमुग्ध
तुझ्याशी जास्तच सलगी करणारी ती बट
एक नजरानजर आणि तुझ्या गालावर आलेली लाली
तुझ्या  प्रेमाची कबुली देऊन गेली
ती दुआ "आपकी जोडी सलामत रहे"
त्यावर तुझं ते गोड लाजून हसणं
अजूनही जशीच्या तशी आठवणारी आपली पहिली भेट

Thursday, June 9, 2016

मन

                                                                                   

का कुणास ठाऊक स्वत:च स्वत:शी बोलत बसतो तासनतास,

मध्येच रडतो मध्येच हसतो जशी बात काहीं खास ,

बोलावे मग कोणाशी...  माणसांचेही भास.

कधी वीट येतो सगळ्याचा , शांतीचा लागतो ध्यास् ,