Sunday, June 12, 2016

आपली पहिली भेट

अजून आठवते मला
ती आपली पहिली भेट
तो तुझा मखमली स्पर्श आणि अंगावरचे रोमांच
तुझा गंध अजून तसाच मनात जपलेला
तुझे ते हळुवार बोलणे आणि मी मंत्रमुग्ध
तुझ्याशी जास्तच सलगी करणारी ती बट
एक नजरानजर आणि तुझ्या गालावर आलेली लाली
तुझ्या  प्रेमाची कबुली देऊन गेली
ती दुआ "आपकी जोडी सलामत रहे"
त्यावर तुझं ते गोड लाजून हसणं
अजूनही जशीच्या तशी आठवणारी आपली पहिली भेट

No comments:

Post a Comment